Maharashtra Weather Update google
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : मोठी बातमी! राज्यात आजपासून मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात, वाचा हवामान विभागाने काय वर्तवला अंदाज

Maharashtra Weather Today: राज्यात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कडाक्याचं ऊन पडलं होतं. काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशापेक्षा जास्त झालं होतं. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाने माणसं होरपळून निघत होती. त्यातच आता हवामान खात्याने दिलासा देणारी खुशखबर दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बदलत्या हवामानाबद्दल मोठी माहिती दिली आहे. राज्यात आजपासून मान्सुन पुर्व पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या ७ मेपर्यंत अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कारण खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भाक ४ ते ७ मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे नागपूर आणि संपूर्ण विदर्भात येत्या २ ते ३ दिवसात हवामानात मोठा बदल होऊ शकतो.

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावामुळे मध्य भारतात या बदलाचा परिणाम दिसून येईल. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडासंह गारपिटीचीही शक्यता आहे.

मराठवाड्यात ५ ते ७ मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकणात सध्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये ४१.८ अंश सेल्सियसवर पारा नोंदवण्यात आलायय तर चंद्रपूरमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उकाडा कमी होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तब्बल 31% इथेनॉल? सरकारच्या दाव्याने खळबळ|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूककोंडी

HDFC FD Rates : HDFC बँकेचा मोठा निर्णय! FD व्याजदर वाढवले, १० लाखांवर मिळणार एवढा परतावा

Thane : मोठी बातमी! मध्यरात्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर पोलीस गाडीला आग

आई-बहिणीवर तलवारीने वार, नंतर प्रेयसीचं अपहरण; तिला संपवतो किंवा मी संपतो, प्रियकराचा पोलिसांसमोर थरार

SCROLL FOR NEXT