Dark clouds gather over Maharashtra as thunderstorms and rain are forecast following a severe heatwave. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल

  • चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

  • वादळी वारे आणि पावसाची शक्यता

पुढील काही दिवसांत वातावरण बदलणार असून काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. एप्रिलपाठोपाठ मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्मघातामुळे काहींचा बळी गेला आहे. या जीवघेण्या उष्णतेपासून पुढील काही दिवसांत सुटका होऊ शकते.

राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सोमवारी ४ मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.

या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ५ मे रोजीही विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला गेला आहे. तर बुधवारी ६ मे रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT