Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : चक्रीवादळ थंडी घेऊन गेले, राज्यात हलक्या पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather News : तामिळनाडूमध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather update News in Marathi : गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे कडाक्याचे थंडी जाणवत होती. पण तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राताली वातावरणात मोठा बदल झालाय. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

फंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री साडेसात वाजता तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. त्यामुळे पदुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस कोसळला. या चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

त्याशिवाय महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वर्तवलाय. चक्रीवादळामुळे तापमान वाढून थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

मागील आठवडाभरातपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट पाहायला मिळले होते. त्यामुळे राज्यात थंडी वाढली होती. काही ठिकाणाचे तापमान उने १० च्या खाली आले होते. पण तामिळनाडूमध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे ऐन थंडीत पावसाची शक्यता आहे.

पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हवामान ढगाळ राङम्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, गुरुवारपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

दाट धुके पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव

जालना जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. अशातच दाट धूक्याची चादर देखील पसरत असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा मक्का यासह द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी महागडे औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याच चित्र जालना जिल्ह्यात दिसून येत आहे.यामुळे उत्पादनात देखील मोठी घट होनार असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.दरम्यान फळबागांवर पसरलेल्या रोगांबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी आता फळबाग उत्पादक शेतकरी करत आहे.

उल्हासनगर,अंबरनाथ मध्ये थंडी वाढल्याने नागरिकांची उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी

उल्हासनगर,अंबरनाथ मध्ये थंडी वाढल्याने नागरिकांनी उबदार कपडे घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे, शहरी वातावरणात चांगलाच गारवा वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपडे घेण्याकडे धाव घेतली असून, गेल्या दोन महिन्यापासून ग्राहकांची वाट पाहणारे रस्त्यावरील स्वेटर, जर्किंग विक्रेत्यांच्या कपड्यांना चांगलीच मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत विक्रेत्यांनीही नेहमीपेक्षा बाजारभाव वाढवले आहेत, मात्र . खिशाला परवडेल अशा १५० ते ५५० रुपयापर्यंत असलेले, स्वेटर आणि जर्किंग घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे.. थंडीमुळे अचानक ग्राहक वाढल्याने उल्हासनगर येथील अनिल अशोक टॉकीज परिसरातील उबदार कपडे विक्रेत्यांची चांदी झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT