Maharashtra Weather News  Saam tv
महाराष्ट्र

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

Maharashtra Weather News: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे ऊन्हाचे चटते वाढले आहेत.

Priya More
  • पश्चिम प्रशांत महासागरामध्ये शक्तीशाली वादळ तयार झाले

  • या वादळामुळे राज्यात मान्सून कमकुवत झाला

  • महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असून उकाडा

  • पुढचे काही दिवस राज्यात असंच हवामान राहणार

मान्सून दाखल होऊन देखील जून महिना कोरडा गेला. पण जुलैच्या पहिल्या ६ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची कमतरता भरून काढली. पण या पावसानंतर आता मान्सूनने विश्रांती घेतली. पाऊस गायब झाला असून आता पुन्हा उकडा सुरू झाला आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून कमकुवत का झाला यामागचं कारण हवामान खात्याने दिले आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या पश्चिम प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या एका शक्तिशाली वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून कमकूवत झाला असून पावसाचे प्रमाण देखील घटले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाने विश्रांती घेतली. घाटमाथ्यावर ५०० मिलिमीटर वरून पाऊस थेट शून्यावर आला आहे. पुढील पाच-सहा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत या भागातील बहुतांश भागांत पावसाची नोंद थेट शून्यावर आली आहे.

पावसाची ही परिस्थिती अनपेक्षित नसून विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ या २४ तासांत केवळ शिरगाव येथे १० मिलिमीटर, भीरा १२, दवडी १०, पोफळी १२ आणि ताम्हिणी येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सलग चार ते पाच दिवस घाट परिसरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.

दरम्यान, उघडीप झाल्यामुळे राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. राज्यातील कमाल तापमान ३५ अंशावर पोहचले असल्यामुळे उकाडा वाढला आहे. पाऊस गायब झाल्यामुळे राज्यात पावसाची उघडीप, उन्हाचे चटके वाढले आहेत आणि उकडा देखील प्रचंड वाढला आहे. हे हवामान पुढील काय दिवस असेच राहण्याची शक्यता आहे. शनिवारी ११ जुलै रोजी सोलापूर येथे सर्वात उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

Maharashtra News Live Update : शिक्षक पदवीधर निवडणुकीचे उमेदवारीवरून महाविकास आघाडीत नाराजी

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; एशियन गेम्सच्या फायनलमध्ये रंगणार महामुकाबला, जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना?

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT