Maharashtra Rain  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: कोकण आणि विदर्भात आज पाऊस, राज्यात कुठे काय परिस्थिती? वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain Update: पावसाळा संपला तरी देखील राज्यात पावसाने विश्रांती घेतली नाही. नवरात्रोत्सव संपून आता दिवाळी सण सुरू झाला तरी देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

Priya More

राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे आहेत. आजही राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भर पावसामध्ये नागरिकांना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. आज राज्यातील विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

पावसाळा संपला तरी देखील राज्यात पावसाने विश्रांती घेतली नाही. नवरात्रोत्सव संपून आता दिवाळी सण सुरू झाला तरी देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. दिवाळीवर पावसाचे सावट असल्यामुळे पावसामध्ये दिवाळी साजरी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज ३१ ऑक्टोबरला कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकणामधील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यत आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती वगळता इतर सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उत्तर नगर आण उत्तर संभाजीनगर, पुणे आणि सातारा येथील १५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित २१ जिल्ह्यात स्वच्छ वातावरण जाणवेल.

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे ४ दिवस पावसाची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. त्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी हळूहळू थंडी पसरण्यास सुरूवात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandoori Roti Recipe: हॉटेलसारखी तंदूरी रोटी घरी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन

महायुती फुटली! भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का; रामदास आठवलेंनी कुठून कोणता उमेदवार उतरवला?

Office Travel Food Tips : ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर ट्रव्हल करताना खाण्या पिण्याची काळजी कशी घ्यावी ? जाणून घ्या

Municipal Election : नाशिकमध्ये महाभारत! भाजपमध्ये उमेदवारांची फरफट, एबी फॉर्मसाठी आमदारांच्या कारचा पाठलाग, सिनेस्टाईल राड्याचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT