Tandoori Roti Recipe: हॉटेलसारखी तंदूरी रोटी घरी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

तंदूर रोटी

३१ डिसेंबर पार्टीसाठी तुम्ही घरच्या घरी हॉटेलसारखी तंदूर रोटी बनवू शकता. घरी तंदूर रोटी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Tandoori Roti

साहित्य

तंदूरी रोटी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, दही, बेकिंग पावडर, साखर, मीठ, तेल, तूप, कोथिंबीर, तीळ हे साहित्य एकत्र करा.

Tandoori Roti

मिश्रण एकत्र करा

तंदूरी रोटी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ, दही, साखर, मीठ, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र करा. या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा आणि पीठ मळून घ्या.

Tandoori Roti

पीठ कापडात झाकून ठेवा

मळून घेतलेले पीठ एका ओल्या कपड्यात झाकून ठेवा. यामुळे पीठ छान फुगते.

Tandoori Roti

रोटी लाटून घ्या

नंतर पिठाचे मध्यम आकारात गोळे करा आणि नंतर पीठाची जाडसर रोटी लाटून घ्या. त्यावर तुम्ही कोथिंबीर आणि तीळ लावून देखील लाटू शकता.

Tandoori Roti

रोटीला पाणी लावा

रोटी तयार झाल्यानंतर दोन्ही बाजूला हलकेसे पाणी लावा म्हणजे पाण्यामुळे रोटी तव्याला घट्ट चिकटून राहते.

Tandoori Roti

रोटी भाजून घ्या

गॅसवर नॉन स्टिकच्या तव्यावर रोटी पसरवून घ्या. रोटी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.

Tandoori Roti

बटर किंवा तेल लावा

अशाप्रकारे रोटी खरपूस भाजून झाल्यानंतर त्यावर बटर किंवा तेल लावा

Tandoori Roti | yandex

next : Shev Bhaji Recipe: घरच्या घरी ढाबास्टाईल शेव भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...