Shev Bhaji Recipe: घरच्या घरी ढाबास्टाईल शेव भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

शेवभाजी

३१ डिसेंबर पार्टीसाठी तुम्ही घरच्या घरी झणझणीत शेवभाजी बनवू शकता. घरीच ढाबास्टाईल शेवभाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Shev Bhaji Recipe

साहित्य

शेवभाजी बनवण्यासाठी जाडी तिखट शेव, कांदा, सुकं खोबरे, लसूण, आलं, कोथिंबीर, तेल, टोमॅटो, जिरे, कधीपत्ता, हिंग, कांदा- लसूण मसाला, लाल मसाला, हळद, धनापावडर, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Shev Bhaji Recipe

वाटण तयार करा

शेवभाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले भाजीचे वाटण तयार करा यासाठी कांदा आणि सुकं खोबरं भाजून घ्या. नंतर आलं- लसूण आणि कोथिंबीर याचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Shev Bhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या नंतर यात वाटण मिक्स करा आणि परतून घ्या.

Shev Bhaji Recipe | Social Media

टोमॅटो मिक्स करा

संपूर्ण मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

Shev Bhaji Recipe

मसाले मिक्स करा

संपूर्ण मिश्रणात मसाले मिक्स करा या मसाल्यामध्ये कांदा-लसूण मसाला, तिखट, हळद आणि धणे पावडर टाका. नंतर यात थोडा गरम पाणी घाला.

Shev Bhaji Recipe

मीठ मिक्स करा

चवीनुसार मीठ घाला आणि शेवभाजीला चांगली उकळी येऊ द्या. अशाप्रकारे तुमची झणझणीत शेवभाजी तयार होईल.

Malvani Shev Bhaji | Saam Tv

NEXT; Paneer Tikka Recipe: 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का, सोपी आहे रेसिपी

Paneer Tikka Recipe
येथे क्लिक करा...