Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यावर आस्मानी संकटाची शक्यता; पुढील ४ दिवस महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Satish Daud-Patil

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे. यामुळे दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

अशातच राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने  (Weather Updates)  वर्तवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून (Weather Forecast) सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे.

याशिवाय सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या सरी पडू शकतात. मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले, तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.

विदर्भातही पावसाची शक्यता

दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT