Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: सतर्क रहा, काळजी घ्या! पावसाचा जोर वाढला, १० जिल्ह्यात गारपीटीची शक्यता; वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain News: राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला तरी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. राज्यामध्ये  23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे आजही अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दि.२३ ऑक्टोबरपर्यंत (१७ ते २३ ऑक्टोबर) पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस कोसळणार आहे. तर बुधवार दि. २३ ऑक्टोबर पर्यन्त ह्या गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे पावसाला पोषक हवामान असल्याने आज धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

तर राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

SCROLL FOR NEXT