मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस
Maharashtra Rain Update Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Rain: मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस

साम टिव्ही ब्युरो

मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची माहिती हवामान विभागनं दिली आहे. राज्यात यंदा लवकर दाखल झालेला मान्सूनने सरासरी वेळेच्या आठ दिवस उशिरा राज्याच्या सर्व भागात पोहोचला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

सिंधुदुर्गात दमदार पाऊस सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून दमदार पाऊस झाला. मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रही खवळलेला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.

रिधोरा ते पांगराबंदी रस्त्याची दुरावस्था, पावसामुळे रस्ता झाला चिखलमय

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा ते पांगराबंदी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पावसामुळे या संपूर्ण रस्त्यावर चिखल साचलाय. पांगराबंदी हे वाशिम जिल्ह्यातील शेवटचं गाव असून या गावाला जाणयासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे नागरिकांना ये -जा करताना मोठा त्रास होत असून अनेक दुचाकी चालक चिखलामुळे या रस्त्यावरून घसरून पडलेत.

अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पांगराबंदी येथील सरपंच गणेश सांगळे यांनी केला आहे.

शेताला तलावाचे स्वरूप

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने परिसरातील ओढ्यांना पूर आल्याने शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतातील मातीसह पेरलेले शेत पिकासह वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर ३' सीरीजचे सर्व एपिसोड ऑनलाईक लीक, निर्मात्यांना मोठा झटका

Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत

Rohit- Virat Dance: वानखेडेवर विराट- रोहितची हवा! ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त नाचले,पाहा VIDEO

Guava Benefits: पेरू खाल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल होईल छुमंतर

Marathi Live News Updates : राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर

SCROLL FOR NEXT