Maharashtra Weather Update  saam tv
महाराष्ट्र

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Maharashtra Weather Update: हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जुलैच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रात मान्सूनचा जोर पुन्हा वाढणार आहे. 'इंडियन ओशन डायपोल' (Indian Ocean Dipole) सक्रिय झाल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • २२ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • इंडियन ओशन डायपोल (IOD) २१ जुलैनंतर सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक मुसळधार पाऊस झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून उसंत घेतलीय. मात्र अचानक पाऊस गायब झाल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय. मात्र शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, सध्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी जुलैअखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

सध्या इंडियन ओशन डायपोल अर्थात ‘आयओडी’ तटस्थ अवस्थेत असला तरी २१ जुलैनंतर तो सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे २२ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पाऊस जुलैअखेर दमदार तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस होणयाचा अंदाज आहे. यंदा कमी कालावधीत जास्त पाऊस असाच पावसाचा पॅटर्न राहील, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलाय. यंदा ‘अल निनो’मुळे पाऊस कमी होणार, असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला होता.

मात्र, १ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. भारतीय समुद्री स्थिरांकावर आधारित आहे. इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) म्हणजेच भारतीय समुद्री स्थिरांक हा महत्त्वाचा घटक ‘अल निनो’चा प्रभाव कमी करून भारतीय उपखंडात पाऊस देऊ शकतो, असा अंदाज अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी वर्तवलाय.

सध्या हवेचे दाब १,१०० हेक्टा पास्कल इतके वाढलाय, त्यामुळे पाऊस कमी झाला. ते दाब जेव्हा १,००४ ते १,००२ वर येतील तेव्हा पाऊस पडेल. सध्या भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थ असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तो अंशतः सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ ते ३१ जुलै या कालावधीत दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘आयओडी’ ऑगस्टच्या सुरुवातीपासून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही चांगला दमदार पाऊस होईल. यंदा कमी दिवसांत जास्त पाऊस हा पॅटर्न राहणार आहे. जसा १ ते ९ जुलै या कालावधीत झाला, तसाच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची दांडी

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

BP - Diabetes : ब्लड प्रेशर अन् डायबिटीजची औषधं घेताना सावधान! 'ही' १ चूक ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT