Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2023) दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील म्हणावा तसा पाऊस (Maharashtra Rainfall) पडला नाही. अर्धा जुलै महिना झाला तरी देखील राज्यातील अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकाऱ्यांसह सामान्य जनता चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अशामध्ये राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy To Heavy Rainfall) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे आहेत. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मोसमामध्ये पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसंच, आज कोकण आणि विदर्भात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.चंद्रपूरमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मुंबईत पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. या पावसामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईतील लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने सुरु आहेत. तर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यासाठी उशीर होत आहे.
- पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.