Maharashtra Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update : राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; नाशिकमध्ये तीन वाहनावर कोसळले झाड, मुसळधार पावसाने दाणादाण

Maharashtra Weather : मागील सात- आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. आज देखील नाशिकसह, नंदुरबार, शहापूर, अमरावती, मनमाड मध्ये जोरदार पाऊस झाला

Rajesh Sonwane

Maharashtra Weather राज्यातील अनेक भागात आज देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील सात- आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. आज देखील नाशिकसह, नंदुरबार, शहापूर, अमरावती, मनमाड मध्ये जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यामुळे भले मोठे झाड रस्तावरील तीन वाहनांवर कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

नाशिकला पुन्हा अवकाळी पावसाने झोडापले

गेल्या आठ दिवसांपासून नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस येत आहे. आज दुपारच्या सुमारास देखील नाशिकला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तर नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात तीन वाहनांवर भलेमोठे झाड कोसळले. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालच दुचाकीवर झाड पडून दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज देखील झाड पडून दोन चारचाकी वाहनासह रिक्षावर झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मनमाडमध्ये पावसाची हजेरी
मनमाड शहरात आज पुन्हा विजांच्या गडगडतात मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असताना दुपारी ४ वाजेनंतर विजांच्या गडगडाटसह मनमाड व परिसरात पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली आहे. सकाळपासून कडक ऊन पडले असताना दुपारी अचानक ढग दाटून आल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. 

नंदुरबारमध्ये सलग सहाव्या दिवशी पाऊस 

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. आज देखील वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नुकताच लागवड केलेल्या शेती पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीतील विक्रीसाठी आलेला धान्य माल खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस
पावसाने मे महिन्यात दमदार हजेरी लावल्याने गेल्या पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आज दुपारनंतर पुन्हा पावसाने विजेच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह तुफान हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात समोरचे काहीच दृश्य दिसत नसल्याचे पाहण्यास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT