Electric Shock : खांबावर काम करताना अचानक विद्युत प्रवाह सुरु; कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Jalgaon News : आयटीआयचे शिक्षण झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून ठेकेदाराच्या माध्यमातून महावितरण कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा महावितरण कर्मचाऱ्यांसोबत जात होता
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

मुक्ताईनगर (जळगाव) : महावितरणकडून सध्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अशाच प्रकारे दुरुस्तीचे काम करण्यासाठी कंत्राटी कामगार विद्युत पोलवर चढला होता. मात्र काम करत असताना बंद करण्यात आलेल्या विद्युत प्रवाह अचानक कोणीतरी सुरु केल्याने कामगाराला विजेचा जोरदार धक्का बसला. यात या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या गावात सदरची घटना घडली आहे. यात महावितरणचा कंत्राटी कामगार असलेला टाकळी येथील नीतेश अशोक पाखरे (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नीतेश पाखरे याचे आयटीआयचे शिक्षण झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून अग्रवाल कंपनीच्या ठेकेदाराच्या माध्यमातून महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा महावितरण कर्मचाऱ्यांसोबत जात होता. 

Electric Shock
Lightning Strike : जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळली; महिलेचा मृत्यू, शेतमजूर जखमी

विजेचा झटका बसताच खांबावरून कोसळला

दरम्यान ११ मे रोजी रुईखेडा गावात दुरीस्तीचे काम करण्यासाठी नीतेश हा वीजखांबावर चढला होता. काम करण्यापूर्वी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र नितेश काम करीत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाला. यात त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खांबावरून खाली कोसळला. यात जबर मार लागला होता. त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

Electric Shock
Shirdi Sai Sansthan : साई चरणी भरभरून दान; ५१४ किलो सोने आणि ६६०० किलो चांदी, दागिने ठेवण्याबाबत संस्थानने काय सांगितले वाचा

ग्रामस्थ संतप्त 

दरम्यान घटना घडल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. तर महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाइकांकडून होत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com