Maharashtra Weather Forecast saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार; परतीच्या प्रवासात दमदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast: वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monsoon News :

वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस वरुणराजा राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पाडणार आहे. झारखंडमध्ये तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झालीय. ते सध्या चक्रीय स्थितीमध्ये आहे. तर सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा रेषा सक्रीय झालाय. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्याच्या चौफेर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. (Latest News)

सप्टेंबरचे ३आठवडे पावसाने दडी मारली असली तरी पुढील आठवडा पावसाचा ठरणार आहे. रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

येत्या २५ आणि २६ सप्टेंबरला मात्र राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच घाट माथ्यावर सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर काही ठिकाणी मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.

परतीचा पाऊस

२५ सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. राज्यात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही ठिकाणी ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT