Mumbai Rain News: बाप्पाच्या आगमनासोबत 'वरुणराजा' परतला; मुंबईत मुसळधार पाऊस

Mumbai Weather Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा परतला असून मुंबई शहरात आज (२२, सप्टेंबर) पावसाच्या सरी बरसल्या.
Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy RainSaam TV
Published On

Mumbai Rain Update:

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच वरुणराजाचीही एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा परतला असून मुंबई शहरात आज (२२, सप्टेंबर) पावसाच्या सरी बरसल्या. नरिमन पॉईंट , कुलबा आणि कफ परेड भागात सकाळ पासून जोरदार पाऊस झाला.

Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Navi Mumbai News: MPSC परीक्षेत हायटेक कॉपी! स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिका फोडली; तिघांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. गणेश चतुर्थीचे दिवस आहेत, अनेक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्यामुळे पावसाचा जोर जर कायम राहिला तर सखल भागात असलेल्या गणेश मंडपात पाणी जाण्याची शक्यता आहे.

भांडुपच्या एलबीएस मार्गावर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे असून एका लेनने वाहने सध्या जात आहेत. पावसाचा जोर कमी जरी झाला असला तरी देखील पाण्याचा निचरा मात्र अद्यापही झालेला नाही याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याने दिला होता इशारा....

दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. गणेश चतुर्थीनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि राज्यात पाऊस पडेल, तसेच पुढील पाच दिवस मु्ंबई आणि उपनगरात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. (Latest Marathi News)

Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Nandurbar News: ज्वलनशील पावडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग; मोठा अनर्थ टळला 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com