Maharashtra Heatwave Alert Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट, येलो अलर्ट जारी; राज्यात कुठे कसं हवामान?

Maharashtra Heatwave Alert: राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. आजही राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

Priya More

राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत चालला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहे. आजही राज्यात सूर्य आग ओकणार आहे. आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे. तर आज सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट, दमट हवामानाची शक्यता आहे. तिन्ही विभागांना येलो अलर्ट दिला आहे. आज सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर जळगाव, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूरसह विदर्भात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरातसह उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहे. यातच विदर्भात हिट व्हेवमुळे अधिकच त्रास जाणवत आहे. प्रादेशिक हवामान खात्याने दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्टमुळे पुढील दोन दिवस हे तापमान ४५ अंशाचा घरात राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत आहेत. विदर्भात तीव्र- उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे.

सोमवारपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे ४४ अंशाचा घरात तापमान राहिल. हे तापमान सामान्यपेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. शनिवारनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्या परिस्थितीत तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर अकोला जिल्ह्यात आजपासून पुढील ३ दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोल्याचे तापमान ४५.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाणार असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT