Scorching heat grips Vidarbha as temperatures soar beyond 44°C, with IMD issuing heatwave warning. saam tv
महाराष्ट्र

Heat Wave: नागरिकांनो सावधान! विदर्भात 8 दिवस उष्ण लाटेचा इशारा; तापमानाचा पारा 45-46 अंशावर जाण्याची शक्यता

Maharashtra Heat Wave News update: तापमान ४५-४६°C पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

Bharat Jadhav

  • विदर्भात पुढील ८ दिवस उष्णलाटेचा इशारा

  • तापमान ४५-४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

  • अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले

राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत असून विदर्भात सर्वाधिक तापमान नोंद झाली आहे. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर नोंदले गेले आहे. तेथील तापमान पारा 44°C, तर नागपूरमध्येही तापमान 42.2°C वर नोंदवण्यात आले. पुढील दिवसांत पारा 45-46°C पर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पुढील 8 दिवस उष्णलाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पार ४० च्या पार गेला आहे. सकाळी 9 वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढतोय. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अंगाची लाही लाही करणारे ऊन पडत आहे. अकोला सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदवण्यात आले आहे.

असे नोंदवले गेले तापमान

अमरावती 43.8°C,

- वर्धा 43.5°C,

- यवतमाळ 42.6°C

- वाशीम 42.4°C,

- गडचिरोली 42.6°C नोंद

दरम्यान राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक कार्यपद्धती जारी केल्या आहेत. उष्णता-संबंधित आजार व मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार आहेत. अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. सध्या तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत पोहोचले असून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये विशेष उष्माघात उपचार कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षांमध्ये रुग्णांचे तापमान कमी करण्यासाठी थंडाव्याची व्यवस्था, ओआरएस पाकिटे, ग्लुकोज तसेच आवश्यक औषधसाठा ठेवण्यात आला आहे. उष्माघातावर तातडीने उपचार करण्यासाठी डॉक्टर व परिचारिकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT