Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Heat Wave In Maharashtra: वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे उष्णतेची लाट लक्षात घेता नागिरकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

Priya More

मे महिन्याला सुरूवात झाली असून तापमान वाढीमुळे पहिलाच आठवडा खूपच त्रासदायक ठरत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. या आठवड्यामध्ये राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यामध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे उष्णतेची लाट लक्षात घेता नागिरकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. मुंबईमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे २७ अंश सेल्सिअस इतके राहिल. तर कोकणात उष्ण आणि दमट असे वातावरण राहिल. राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता नागिरकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा, जास्तीत जास्त पाणी प्यावी, असे आवाहन केले जात आहे.

एकीकडे हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा इशाला दिला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भामध्ये सध्या कमाल आणि किमान तापमान सामान्य आहे. याठिकाणी उष्णतेची लाट देखील सामान्यच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

दरम्यान, देशामध्ये देखील वाढत्या तापमानाचा परिणाम पाहायला मिळत आहे. भारतातील हवामान खात्याने देशभरातील वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतातील विविध भागात तीव्र उष्णता राहिल आणि तापमान साधारणत: 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे सिक्कीम,ओडिशा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्येही हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT