Maharashtra Weather Report Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Report: राज्यात येत्या ४८ तासांत अवकाळीसह जोरदार गारपीटीची शक्यता; या विभागाला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates: येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates: गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचं संकट कधी दूर होणार याची वाट बळीराजा पाहत असताना हवामान विभागाने चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

येत्या ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या या अंदाजामुळे बळीराजाची चिंता आणखीच वाढली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या म्हणजेच येत्या ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल. याशिवाय काही ठिकाणी भागात तुफान गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट

हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट देखील जारी केला आहे. वाऱ्याची द्रोणीय स्थिती म्हणजेच कमी दाबाचा पट्टा पूर्व विदर्भापासून तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटकामधून उत्तर तमिळनाडू पर्यंत जात आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या तीनही विभागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात आज १ मे रोजी गारा पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. ऐन उन्हाळ्यात विदर्भातील जवळपास सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीही निर्माण झाली आहे.

विदर्भात अवकाळी पावसाचा कहर

दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीनंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस कोसळला. पावसाचा हाच ट्रेंड रविवारीही कायम होता. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील हवामानाची स्थिती काय?

राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशातील हवामान बदलाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या कलदगाव येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

Mumbai To Amruteshwar Temple: रेल्वेने, बसने की कारने? मुंबईवरून अमृतेश्वर मंदिराला जाण्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते?

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT