Manmad APMC Result: मनमाडमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

Manmad APMC Election Result: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचे १८ पैकी १२ जागांवर उमेदवार निवडणूक आले आहेत.
Manmad APMC Result
Manmad APMC ResultSaam TV
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

Manmad APMC Election Result : राज्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. बाजार समिती निवडणुकांत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे, महायुतीनेही यंदा या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी निकाल जाहीर झाला असून निवडणुकीत महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. (Latest Marathi News)

Manmad APMC Result
Supreme Court News: 'घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नाही...' काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय?

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) महाविकासआघाडीचे १८ पैकी १२ जागांवर उमेदवार निवडणूक आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला असून शिंदे गटाला अवघ्या तीन जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याव्यतिरिक्त व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. (Breaking Marathi News)

Manmad APMC Result
Hingoli News: चॅलेन्ज अंगाशी आलं; आमदार संतोष बांगर मिशा काढणार का?, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांची शेलक्या भाषेत टीका

त्याचबरोबर हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार मधुकर उगले यांनी पहिल्या फेरीतच १६ मतांनी विजय मिळवला असून त्यांना एकूण ७४ मते मिळाली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्यापारी गटातून अपक्ष व्यापारी विकास पॅनलचे किसनलाल बंब ६९ मतं मिळाली असून रुपेश कुमार ललवाणी हे ७६ मते मिळवून विजयी झाले.

तर नवनिर्माण व्यापारी विकास पॅनलचे प्रकाश आव्हाड व रवींद्र आहेर यांचा पराभव झाला. दरम्यान, या निवडणूकीत महाविकास आघाडीला १२ जागा, तर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे गटाला फक्त तीनच जागेवरच विजय मिळवता आला आहे. मनमाड निवडणूकीत कांदे यांच्या पॅनलचा पराभव होणं, हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com