Maharashtra Weather Forecast Today saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून दिलासा मिळणार! राज्यात 'या' तारखेपासून मुसळधार पावासाचा अंदाज

Shivani Tichkule

Maharashtra Rain Update: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे रडखडलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून (23 जून) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पाऊस कोसळणार आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात देखील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Monsoon Update)

यंदा राज्यात मान्सून लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आल्याचं चित्र आहे. बळीराजा पाऊस (Monsoon) कधी येणार यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर (Farmer) दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.

येत्या ७२ तासांत या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस

पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मुंबई, कोकण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain Updates) कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

Pant vs Litton Das: भाई, मला का मारतोय? भर मैदानात पंत-लिटन दासमध्ये राडा, नेमकं काय घडलं, पाहा Video

SCROLL FOR NEXT