Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार, आठवडाभर कसं असेल हवामान, कुठं कुठं पडणार कोसळधारा?

heavy rainfall alert, June rain update : राज्यात १२ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, हवामान विभागाने १३ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भात पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra monsoon, IMD rain forecast : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. गुरूवारपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून राज्यात परतल्यानंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठवडाभर राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाहूयात पुढील आठ दिवस राज्यात कसं असेल वातावरण....

मध्यम पावसाची शक्यता

गुरुवार दिनांक १२ जून पासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवार दि. १२ ते सोमवार दि. १६ जून अश्या पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही शनिवार दि. १४ ते सोमवार १६ जून ह्या तीन दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय.

१३ जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील आठ दिवस सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी  यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अश्या १३ जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र सध्या मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.

मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होणार -

गेल्या आठ दहा दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला आहे. त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही.  अजून पुढील तीन दिवस तरी मान्सून सक्रियतेची लक्षणे दिसत नाही. कारण मान्सून उर्जीतवस्था येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही. मात्र त्यानंतर म्हणजे गुरुवारपासून मान्सूनची सक्रियता व वाटचाली साठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्रात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?

सध्या काही शेतकरी धूळ पेरणीचा विचारात आहे. परंतु ३ दिवसानंतर मान्सून सक्रिय झाल्यावर, रविवार १५ जून नंतर, चांगल्या मान्सूनच्या पावसानंतर येणारी ओल, उत्तम वाफसा  आणि स्वतःच्या विवेकावर पेरणीचा निर्णय घ्यावा, असे वाटते. परंतु  त्यातही ज्यांच्याकडे बक्कळ ओल व सिंचनाची व्यवस्था आहे, अश्या शेतकऱ्यांनी एक दोन दिवसात स्वतः च्या हिमतीवर, आपल्या जमिनीचा पोत जाणून, पेरणीचा निर्णय करावा. ज्यांनी मे महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी पावसाच्या ओलीवर गेल्या ८-१० दिवसापूर्वी पेरण्या केल्या असतील अश्या शेतकऱ्यांनीही घाबरू नये. असे वाटते. कारण येत्या तीन दिवसानंतर मान्सून सक्रियतेच्या शक्यतेनुसार त्या आगाप पेरी मार्गी लागू शकतात, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT