Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather: कोकण आणि विदर्भात धो-धो, ऑरेंज अलर्ट जारी; आज कुठे कसा पाऊस?

Maharashtra Rain Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी इतर ठिकाणी तुफान पाऊस सुरू आहे. आज कुठे कसं हवामान आहे वाचा सविस्तर...

Priya More

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आले. आता काही ठिकाणी जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर मात्र कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. आज कोकण आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथ्यावर सध्या जोरदाराचा जोर कायम आहे. आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीसह पुण्याचा घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भाला पावसचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणच्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. शनिवारी काह ठिकाणी थोड्या वेळासाठी पाऊस पडला. आज सकाळपासून मुंबई पाऊस नाही. तर इतर ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. तर दुसरीकडे, जळगावात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आता पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून जून महिन्याचा २२ तारीख येऊनही आजपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून पेरणीला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

SCROLL FOR NEXT