Maharashtra Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार, इतर ठिकाणी पावसाची उघडीप; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा.

  • चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता.

  • सोलापूरमध्ये ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे पावसाला पोषक वातावरण.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे.

राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दिवसभरात तापमान वाढल्याचे चित्र दिसले. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात उघडिपीचे वातावरण राहील, परंतु अधूनमधून हलक्या सरींची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांतही अधूनमधून रिमझिम पाऊस सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक पासून, तमिळनाडू ते मान्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

हवामान तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT