Maharashtra Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather Update Today: राज्यात पुढील दोन दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

पुढील ४८ तासांमध्ये मुंबई आणि पुण्यासोबत राज्याच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात आजापासून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली (Maharashtra Weather Forecast) आहे. सोलापूर आणि अकोल्यामध्ये उच्चांकी म्हणजेच ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल झाली आहे. आज मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला (Rain Alert In Marathwada Vidarbha) आहे. तर सोलापूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, गडचिरोली, ब्रम्हपुरी, अमरावती, परभणी, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४३ अंशापेक्षा जास्त होतं.

राज्यात पुढील दोन दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली (Heatwave Alert) आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन आयएमडीने केलं आहे. पुढील २४ तासांमध्ये बीड, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.

राज्यात या आठवड्यात देखील उकाडा कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाला पोषक हवामान होतंय. आज मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा (Maharashtra Weather Update Today)अंदाज आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि उन्हाचा कडाका असं दुहेरी हवामान सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT