Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आज विदर्भ, मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये उष्णतेची लाट; कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Latest Update: राज्यात सर्वजण मान्सुनची वाट पाहात आहेत. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Rohini Gudaghe

आज विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्र विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. मागील ४८ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये हवामानात काही अनपेक्षित बदलांची नोंद केली गेली आहे. बुधवारी पुण्यामध्ये तापमानात अचानक ९ ते १० अंशांची घट झाल्याचं जाणवलं. तिथे अचानक काहीसं थंड वातावरण जाणवत आहे.

पुणे आणि सातारा, सांगली पट्ट्यामध्ये हवेत गारवा जाणवणार असल्याचं सांगण्यात आलं (Maharashtra Weather Forecast) आहे, तर मुंबईत देखील २४ तासांत शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात मोठी घट पाहायला मिळाली आहे. परंतु उष्मा कमी न झाल्यामुळे नागरिकांना अजून उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. विदर्भात अजूनही उन्हाचा चटका कायम आहे. आज मुंबईसह उत्तर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला (Rain Alert) आहे.

महाराष्ट्रात देखील विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा अधिक तापदायक ठरत आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा येथे काल प्रत्येकी ४५.२ अंश तापमान नोंदवले गेले. तेथे उष्णतेची लाट होती. चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्याला उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट दिला गेला आहे. बंगालच्या उपसागरामधील ‘रेमल’ चक्रीवादळ निवळल्याची माहिती (Maharashtra Monsoon Latest Update) मिळत आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा या तिन्ही जिल्ह्यांना उष्ण लाटेचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट (Heat Wave Alert) देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाण्यामध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. हवामान विभागानं दमट हवामान राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. दमट हवामान राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. पुढील चार दिवसांमध्ये राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार असं आयएमडीने सांगितलं आहे. राज्यात १० जूनपर्यंत मान्सुनचं आगमन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT