Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात धो-धो, नदी-नाल्यांना पूर; आज कुठे कसा पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: राज्यात सगळीकडेच तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. आज देखील राज्यात तुफान पाऊस पडण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.

Priya More

राज्यात सध्या धो-धो पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस अक्षरश: झोडपून काढत आहे. गुरूवारी राज्यात मान्सूच्या सुरूवातीच्या टप्प्यातील आतापर्यंतचा चांगला पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. सर्वाधिक पाऊस कोकणात झाला. राज्यासाठी आजचा दिवस देखील खूपच महत्वाचा आहे.

आज देखील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्हे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला आज पाऊस झोडपून काढणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहवे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील घाटमाथा, साताऱ्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तसंच आज मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Pune Accident : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार दरीत कोसळली

Janmashtami Baby Photos: मोरपिस व बासरीसह मुलांना द्या गोंडस कृष्ण रूप

Tea : दिवसातून किती वेळा चहा प्यावा? चहाप्रेमींनो आताच जाणून घ्या

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT