Maharashtra News  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain Alert: राज्यात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून १४ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कुठे काय परिस्थिती वाचा सविस्तर..

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

  • मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह तुफान पावसाचा अंदाज आहे.

राज्याला परतीचा पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत असून या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवानाम खात्याने वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी तुफान पाऊस आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ तासांत अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे , रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर आज नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

SCROLL FOR NEXT