Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात 'डिप्रेशन'; महाराष्ट्रात हवामान बदलणार, पाहा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस...

Maharashtra Weather, Bay of Bengal Depression : बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार झाल्याने महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा घाटमाथ्यासह जालना, परभणी आणि हिंगोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Bay of Bengal depression impact on Maharashtra weather : बंगालच्या उपसागरात हवामानाच्या घडामोडी वेगाने बदलल्या असून तिथे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले आहे. यामुळे निर्माण झालेल्या वादळी प्रणालीचा थेट परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर पाहायला मिळत आहे. राज्यात बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी या नव्या प्रणालीमुळे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, हवामान विभागाने आज (ता. १८) काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, मध्य भारतावर परस्परविरोधी वारे एकत्र आल्यामुळे आणि पश्चिम मध्य प्रदेशवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात हे बदल पाहायला मिळत आहेत.

'या' भागांत विजांसह पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पाऊस पडू शकतो. जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या श्रावण सरी बरसण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात नक्की काय घडतंय?

वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हवेच्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण झाले आहे. कोलकत्याजवळ असलेली ही प्रणाली पश्चिम बंगालच्या बंकुरापासून १६० किमी आग्नेयेकडे, तर ओडिशाच्या बलेश्वरपासून १८० किमी ईशान्येकडे केंद्रित आहे. ही प्रणाली अधिक बलवान होत असून पुढील काही ताशांत ती पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या दिशेने पुढे सरकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT