Heavy Rain Alert in Maharashtra IMD reports saam tv
महाराष्ट्र

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

imd warning maharashtra hailstorm lightning forecast : महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस धोक्याचे असून, या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Nandkumar Joshi

  • राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस

  • विजांच्या कडकडाटासह गारपीट

  • नागरिकांनी सतर्क राहावे

  • राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीनं आवाहन

गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असतानाच, आता काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजेच, २० एप्रिलपासून पुढील पाच दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD Alert) हा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD weather update) २० एप्रिल २०२६ रोजी पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी अलर्ट राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • विजांचा कडकडाट सुरू झाला किंवा वीज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

  • झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.

  • मोकळ्या जागेत मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.

  • निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.

प्रशासनाने काय करावं?

  1. ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी.

  2. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत.

  3. शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात.

  4. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित द्यावेत.

नागरिकांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका!

शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत.

बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे.

यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे.

सर्व संबंधित यंत्रणांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या सतर्क राहण्याच्या सूचना

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

आता ATMवर मिळणार रेशन? रेशन दुकानात चकरा मारण्याचा त्रास वाचणार?

सोशल मीडियावर नालायकांची झूंड, उद्योजिका नमिता थापर यांना शिव्यांची लाखोली

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भाजपला जोरदार धक्का, साताऱ्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

6,4,4,6,6 ....तिलक वर्मा ऑन फायर; हार्दिक पंड्याची रिअॅक्शन व्हायरल, VIDEO

SCROLL FOR NEXT