Maharashtra Water Issue Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Water Issue: राज्यात नववर्षात पाणीबाणी; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक, पाहा आकडेवारी

Ruchika Jadhav

Maharashtra water supply:

राज्यात साल २०२३ मध्ये अनेक ठिकाणी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यातील तीन हजार धरणांतील पाणीसाठा ७६.२० टक्के असल्याचं समजलंय. यामुळे उन्हाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०.२५ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झालीये. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच जाणवू लगल्यात. राज्यात २ हजार ९९४ लहान-मोठी धरणे आहेत. या धरणांतील पाणीसाठा कमी होत चाललाय.

भातसा:

गेल्या वर्षी - ८२.८१

या वर्षी - ७७.८०

मोडक सागर

गेल्या वर्षी ७६.२३

या वर्षी ६८.०५

तानसा

गेल्या वर्षी ८४.९९

या वर्षी ७९.७९

मध्य वैतरणा

गेल्या वर्षी ४९.५७

या वर्षी ४७.३७

राज्यातल्या मोठ्या धरणांमधील पाणीसाठा

नागपूर

गेल्या वर्षी ८१.०१

या वर्षी ७०.१७

अमरावती

गेल्या वर्षी ८६.६५

या वर्षी ७२.३६

संभाजीनगर

गेल्या वर्षी ९०.७३

या वर्षी ४३.४२

नाशिक

गेल्या वर्षी ९७.२१

या वर्षी ७३.७९

पुणे

गेल्या वर्षी ८७.११

या वर्षी ८१.१७

राजकीय वर्तुळात देखील पाणी प्रश्नावरून भाष्य केलं जातंय. पुणे शहरात पाण्याची परिस्थिती भविष्यात गंभीर होणार असून मोठा प्रश्न उद्भवणार आहे. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी या संदर्भात पत्र लिहून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती, खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. आधी पाणी पिण्यासाठी द्या आणि नंतर शेतीला द्या, अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT