Pune Dam Water Level: 'पुणेकरांनो पाणी जपून वापरा...' पाटबंधारे विभागाकडून पालिकेला सूचना; लवकरच पाणी कपातीचा निर्णय?

Pune Water Storage: पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
Pune Dam Water Level
Pune Dam Water LevelSaam TV
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. २१ डिसेंबर २०२३

Pune Water Crisisi News:

पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी धरणातील कमी झालेला पाणीसाठा चिंतेची बाब ठरू लागली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याची बचत करा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिल्या आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यामध्ये यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने ओढ दिली. त्यामुळे पुण्यासह (Pune) अनेक शहरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण (Khadakwasala Dam) साखळी क्षेत्रात सुद्धा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.

यासंबंधी येत्या काही दिवसात पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये पाणी कपातीचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. तत्पुर्वी आगामी काळात निवडणुका असल्यामुळे पुण्यात पाणी कपातीचा निर्णय घेणे सरकारला कितपत फायद्याचं राहणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Dam Water Level
Maharashtra Politics: उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री प्रकरणावरुन भाजप आक्रमक, 'इंडिया आघाडी'विरोधात राज्यभर निदर्शने

पुण्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा..?

पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव धरणांमध्ये एकूण ८८.४१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी खडकवासला धरणात ७७.०७ टक्के, पानशेत धरणात ८८.२७ टक्के, वरसगाव धरणात ८२.०५ टक्के, आणि टेमघर धरणात ३८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

दरम्यान, मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच या चारही धरणांमधला पाणीसाठा ८८.४१ टक्के इतका होता. तर या वर्षी चारही धरणांमध्ये पाणीसाठा ७८.४७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. (Latest Marathi News)

Pune Dam Water Level
Maharashtra Politics: उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री प्रकरणावरुन भाजप आक्रमक, 'इंडिया आघाडी'विरोधात राज्यभर निदर्शने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com