Maharashtra Water Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Water Crisis: चिंता वाढली! राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट, फक्त ६४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Maharashtra Water Crisis: राज्यात यंदा पाऊस न झाल्यामुळे पाणी संकट भीषण आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. धरणांमध्ये फक्त ६४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Priya More

राज्यात यंदा म्हणावा तसा पाऊस पडला नाही. कमी पाऊस झाल्यामुळे राज्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. शेतीसाठी पाणी नसल्यामुळे पीकं करपून गेली. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. राज्यातील धरणांची स्थिती देखील गंभीर आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील धरणांमध्ये फक्त ६४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पाणीसाठ्यामध्ये २६.३७ टक्क्यांची तूट आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे राज्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. पुढचे ६ महिने काटेकोरपणे पाणी वापराचे नियोजन करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाने नुकताच दिलेल्या एका अहवालानुसार, १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३३,८२८.७३ दशलक्ष घनमीटरपर्यंत मर्यादित झाला आहे. राज्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. संभाजीनगर विभागात फक्त ३६.७५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाने सांगितले की, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील एकूण ३०४२ धरणांमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत ६४.१७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. मागच्यावर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ९०.५४ टक्के इतका होता. त्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठ्यात २६.३७ टक्क्यांची तूट आहे. राज्यातील अनेक शहरावर यंदा पाणी कपातीची टांगती तलवार आहे. काही प्रमुख शहरातील महानगर पालिकांनी आधीच पाणीकपात जाहीर केली आहे.

मागच्या वर्षी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यातील सर्व धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ४१ हजार ९.६६ घनमीटर इतकी होती. त्यापैकी सध्या २६ हजार ३१६.२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा संभाजीनगर विभागात आहे. त्यानंतर अमरावती विभागात ५२.२७ टक्के, नागपूर विभागामध्ये ५६.०२ टक्के, नाशिक विभागामध्ये ७४.०५ टक्के, पुणे विभागात ७४.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये ऊस दर आंदोलनाचा पुन्हा एल्गार

Trolley Bag Cleaning Tips: फिरायला जाण्यापूर्वी ट्रॉली बॅग कशी स्वच्छ करायची? 5 सोप्या टिप्स

C Section Delivery: सिझेरियन प्रसूतींवर सरकारची नजर; आता प्रत्येक ऑपरेशनचं सांगावं लागणार कारण

Shocking : मुंब्र्यात मिठाई खाल्ल्याने एकाचा मृत्यू; पाच जणांची प्रकृती गंभीर, FDA कडून तपास सुरू

भारतीय लष्कराला मोठं यश! CRPF तुकडीवर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

SCROLL FOR NEXT