Water Storage : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासलाच्या पाणीसाठ्यात वाढ; अवकाळी पावसामुळे दिलासा

Pune Dam Water Storage : मुरासु चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाची हजेरी. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत २३.५१ टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.८९ टीएमसीने घट झाली आहे.
Pune Dam Water Level News
Pune Dam Water Level News AI Image
Published On: 
Summary
  • पुण्यात मुरासु चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची हजेरी

  • खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून २३.५१ टीएमसी पाणीसाठा

  • एकूण धरण क्षमतेच्या ८०.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.८९ टीएमसीने पाणीसाठा कमी.

अर्णबनंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरासु चक्रीवादळामुळे देशभरातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. या वादळामुळे ऐन हिवाळ्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याची चांगली बाजू म्हणजे अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदाचा पाणीसाठा फार कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पुण्यात आज सकाळपासून पावसाने धुडगूस घातला आहे. यामुळे खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. २४ तासांच्या कालावधीत झालेल्या पावसाने पानशेत धरण परिसरात सर्वाधिक १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर वरसगाव येथे ११, खडकवासला येथे ८ आणि टेमघर येथे ५ मिलिमीटर पाऊस पडला.

Pune Dam Water Level News
Death News : आई पहाटे ४:३० वाजता उठवायला गेली पण...' लोकप्रिय अभिनेत्याचा झोपेतच मृत्यू,सिनेसृष्टीवर शोककळा

सध्या चारही धरणांमध्ये मिळून २३.५१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा धरणांच्या एकूण क्षमतेच्या ८०.६५ टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये २८.४० टीएमसी म्हणजेच ९७.४१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८९ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. चारही धरणांपैकी टेमघर धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक ३ हजार २५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ पानशेतमध्ये २ हजार ३५५, वरसगावमध्ये २ हजार २०८ आणि खडकवासला धरण परिसरात ७९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Pune Dam Water Level News
Breaking News : मोठी बातमी! सलग दुसऱ्यादिवशी आणखी एका आमदाराने दिला राजीनामा; राजकारणात खळबळ

पाणीसाठ्याचा विचार करता वरसगाव धरणात सर्वाधिक ८५.६३ टक्के पाणी शिल्लक आहे. टेमघर धरणात ८४.६३ टक्के, पानशेतमध्ये ७७.६७ टक्के, तर खडकवासला धरणात सर्वांत कमी ५६.८२ टक्के पाणीसाठा आहे.धरणनिहाय पाणीसाठा पाहता खडकवासला येथे १.१२ टीएमसी, पानशेतमध्ये ८.२७ टीएमसी, वरसगावमध्ये १०.९८ टीएमसी आणि टेमघरमध्ये ३.१४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.