Maharashtra Exit Poll 2024 vidhan sabha : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. ELECTORAL EDGE यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी केलेला एक्झिट पोल समोर आलाय. त्यानुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा अंदाजही यामधून वर्तवण्यात आला आहे.
ELECTORAL EDGE च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचे दिसतेय.
ELECTORAL EDGE च्या अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. महाविकास आघाडीला राज्यात १५० जागांवर यश मिळेल असा अंदाज वर्तवलाय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४४ जागांवर यश मिळेल.
महायुतीकडून सरकार जाईल असा अंदाज ELECTORAL EDGE यांनी व्यक्त केला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळतील. तर शिवसेना शिंदे गटाला फक्त २६ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
इतर ठिकाणी किती ?
अपक्ष आणि इतर पक्षाला राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंडखोरांमुळे राज्यातील समिकरण बदलेलं असा अंदाज आहे.
कुणाला किती टक्के मतं?
ELECTORAL EDGE च्या अंदाजानुसार, भाजपला २४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर अझित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.