Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Hatkanangle Assemblye Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान, सकाळच्या एक्झिट पोलनुसार, हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे विजयी होणार असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता कोण बाजी मारणार याकडे सर्वाचंचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सकाळ माध्यम समूहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे.हातकणंगले विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पारडं जड होताना दिसत आहे.

हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होती. काँग्रेस राजू आवळे विरुद्ध शिंदे गटाचे अशोकराव माने हे निवडणुकीच्या रिंगणात होते. हातकणंगले येथे राजू आवळे हे संभाव्य आमदार आहे.

हातकणंगले हा खूप महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०१९ मध्येही काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती. त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे चित्र समोर आले आहे. (Hatkanangle Assemblye Election)

हातकणंगले मतदारसंघात ७६ टक्के मतदान झाले आहे.या मतदारसंघा महायुती, महाविकाआघाडी आणि शेतकरी संघटना अशा तिन्ही गटांचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. राजू आवळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे ही त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरु शकतात.त्यामुळे या मतदारसंघात विकासकामाच्या जोरावर काँग्रेसचे राजू आवळे विजयी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT