MVA Seat-Sharing Formula for Upcoming Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 100 जागांवर दावा? ठाकरे गट आणि काँग्रेसने किती जागांची केली मागणी? वाचा...

MVA Seat-Sharing Formula for Upcoming Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष असलेल्या शरद पवार गटाने 100 जागांवर आपला दावा सांगितला आहे.

साम टिव्ही ब्युरो

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. ज्याठिकाणी ताकद जास्त असेल त्याठिकाणी पक्षाला जागा देण्यात येणार असल्याचं समजतंय.

त्यानुसार विधानसभेला काँग्रेस 100 ते 105, ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदरात 80 ते 85 जागा पडण्याची शक्यता आहे. तसंच लोकसभेला जागावाटपात सांगलीसारख्या जागेवर झालेल्या चुका टाळण्याचाही महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं समजतंय.

शरद पवार गटाचा 100 जागांवर दावा?

असं असलं तरी शरद पवार गटाने 100 जागांवर दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभानिहाय मतदारसंघाची माहिती घेणार आहे आणि त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, प्रत्येक पक्षाने 100 जागा मागितल्या तर 300 जागा तयार कराव्या लागतील, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, 100 जागा मागितल्या तर 300 जागा कराव्या लागतील, आता 288 च आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

Maharashtra Live News Update : साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

Sonalee Kulkarni: मन साडीत, पैठणीत, पोलक्या परकरात…, युरोपीयन मराठी संमेलनातील अप्सराचा खास लूक पाहिलात का?

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT