MLC ELECTION 2026: BJP VS CONGRESS BIG FIGHT LIKELY AI Image
महाराष्ट्र

MLC Election : रावसाहेब दानवेंचा भाऊ आमदार होणार? जालन्यातून नाव चर्चेत, भाजप तिकीट कुणाला तिकीट देणार?

Bhaskar Danve BJP MLC candidature news : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे भास्कर दानवे यांचे नाव चर्चेत आले आहे. दुसरीकडे चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदारसंघात घोडेबाजार आणि मत खरेदीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Maharashtra Legislative Council election latest updates : राज्यात विधान परिषदेच्या १७ जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच मराठवाड्यातला महत्त्वाचा असलेला छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे भास्कर दानवे यांचे नाव चर्चेत आहे. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला आहे. (Maharashtra MLC election 2026)

भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू आहेत. सध्या ते भाजपचे जालना महानगराध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळत आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी भास्कर दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षापासून भास्कर दानवे यांनी महायुतीचा धर्म पाळत अनेकदा माघार घेतली आहे. मात्र यावेळी भास्कर दानवे यांच स्वप्न पूर्ण होऊन त्यांना पक्ष श्रेष्ठीकडून विधान परिषदेची संधी मिळते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय यावेळी विधानपरिषदेवर जालन्यातील प्रतिनिधित्व मिळेल का याची उत्सुकता सर्वांनाच लागली.

एका मताची किंमत १० लाख? विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच तिन्ही जिल्ह्यांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीपूर्वीच संभाव्य घोडेबाजार आणि पैशांच्या राजकारणाच्या चर्चांनी वातावरण तापले आहे.

दक्षिण गडचिरोलीतील एका बैठकीत शेजारील जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका कंत्राटदार आमदाराने नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिल्याचा दावा एका नगरसेवकाने नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे. तसेच एका मताची किंमत तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT