Vidhan Parishad Election 2026 saam tv
महाराष्ट्र

Vidhan Parishad Candidate: भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते?

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Priya More

Summary -

  • विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा

  • भाजपनंतर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावं जाहीर

  • १० जागांसाठी विधान परिषद निवडणूक होणार आहे

  • भाजपकडून ६ उमेदवारांची नावं जाहीर

विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर होत आहेत. भाजपने मंगळवारी रात्री ६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेना शिंदेगटाकडून देखील २ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. कोणत्या पक्षाकडून नेमकं कुणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने ६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपकडून सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपकडून प्रज्ञा सातव यांचे नाव आधीच फायनल करण्यात आले होते. तर उर्वरीत ५ उमेदवारांची नाव ठरवताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा विचार करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आज घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पण ते ही निवडणूक लढवणार नाही. त्यांनी पक्षाच्या निष्ठावंताला संधी दिली आहे. शिवसेना ठाकरेसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले आहे. ठाकरेसेनेकडून अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवानेता झिशान सिद्दिकीचे नाव फायनल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता नेमकं कुणाला संधी देतेय हे काही वेळात स्पष्ट होईल. आता फक्त शिवसेना शिंदेगटाच्या २ उमेदवारांची नावं जाहीर करणं बाकी आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहाटे काळाचा घाला! नागपूरमध्ये विटांनी भरलेला ट्रक उलटला, ३ जणांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय; महिला व बालविकास विभागाने दिली ईकेवायसीवर महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम

Kelphulachi Bhaji Recipe : केळफुलाची भाजी कधी खाल्ली आहात का? वाचा झटपट होणारी पारंपरिक रेसिपी

Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

SCROLL FOR NEXT