Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: लोकसभेनंतर विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच! महायुती- मविआमध्ये इच्छुकांची गर्दी; ठाकरेंच्या 'सांगली पॅटर्न'ने डोकेदुखी वाढणार?

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: इच्छुकांची गर्दी, बंडखोरीची तंबी, नाराजीनाट्य अन् पक्षांतर्गत कुरघोड्या संपवता संपवता सर्वच नेत्याच्या दिग्गजांची अक्षरश: दमछाक झाली. आता लोकसभेचा रणसंग्राम संपल्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषद तिकीटावरुन महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर पेच उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे मुंबई| ता. २७ मे २०२४

लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. इच्छुकांची गर्दी, बंडखोरीची तंबी, नाराजीनाट्य अन् पक्षांतर्गत कुरघोड्या संपवता संपवता सर्वच नेत्याच्या दिग्गजांची अक्षरश: दमछाक झाली. आता लोकसभेचा रणसंग्राम संपल्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषद तिकीटावरुन महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर पेच उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचे वेध लागले आहेत. २६ जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत तर १ जुलैला निकाल लागणार आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.

ठाकरे गटाकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच पुन्हा एकदा मुंबई शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई पदवीधर जागेवर दावा केला. मात्र भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवताना प्रमुख नेत्यांचा कस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

तसेच महाविकास आघाडीत कोकण पदवीधरच्या जागेवरुनही रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. कोकण पदवीधर जागेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत.ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

परंतु याठिकाणी काँग्रेससुद्धा आग्रही असून रायगडमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता या चार जागांचा तिढा महाविकास आघाडी तसेच महायुतीचे पक्षश्रेष्ठी कसा सोडवतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT