Maharashtra Unseasonal Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, रस्त्यावर झाडे पडली...पिकांसह घरांचे नुकसान; वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू

Maharashtra Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले. राज्यात कुठे-कुठे काय परिस्थिती आहे त्यावर आपण नजर टाकणार आहोत...

Priya More

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर झाडं पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात कुठे-कुठे काय परिस्थिती आहे त्यावर आपण नजर टाकणार आहोत...

बुलडाणा -

बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शेगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्यात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे उन्हाळी पिकांचही मोठं नुकसान झाले आहे.

सोलापूर -

सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. भर कडक्याच्या उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला. ढगांच्या गडगडाटसह सोलापूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लातूर -

लातूर-निलंगा महामार्गावर बाभळीचे झाड पडून गेल्या 1 तासापासून वाहतूक कोडमडली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे देखील वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत तारा तुलट्यामुळे काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान लातूरच्या चाकूर तालुक्यातील माहलंग्रा शिवारात शेतात काम करणाऱ्या दोन व्यक्तींवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांच्या उभ्या वाहनांवर झाडे पडून नुकसान झाले आहे.

अकोला -

अकोला जिल्ह्यातील अकोट भागात जोरदार वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पणज गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतमाल गोदामावरील टिनपत्रे वाऱ्यामुळे उडाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे.

बीड -

बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून तापमानाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. एकीकडे पाण्याचा तीव्र दुष्काळ असताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच उष्णतेचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसाने दिलासा मिळाला. बीडच्या नवगण राजुरी परिसरात सुसाट वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांना गर्मीपासून दिलासा मिळाला.

धाराशिव -

धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे थैमान घातलं. उमरगा तालुक्यातील व्हांताळ गावातील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. येरमाळा येथील दुकानाचे पत्र्याचे शेड उडून जाऊन अनेकांचे व्यवसाय उघड्यावर पडले आहेत. काजळा, कोंड आणि कळंब परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने अनेकांची तारांबळ उडाली. गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे.

यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्याला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यवतमाळच्या आर्णी आणि महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाचा टिनपत्रामुळे कापला हात कापला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आर्णी, महागांव तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. पाभळ येथील पंचवीस घरांची पडझड, अनेक घरावरील टिनपत्रे उडाली. हजारो झाडे उन्मळून पडली. झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. चक्रीवादळात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

वाशिम -

वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमान 44 च्या वर असताना आज जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT