Unseasonal rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain News: राज्यात अवकाळीचे थैमान; वीज पडून ६ जणांचा मृत्यू २९ जनावरे दगावली

अमरावतीमध्ये १५१ घरांची पडझड झाल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Rain News : राज्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी वीज, वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. या आपत्तीमध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय २९ जनावरे मृत पावली आहेत. ७१५८ हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीमध्ये १५१ घरांची पडझड झाल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

अंगावर वीड कोसळून 6 जणांचा मृत्यू

अंगावर वीज कोसळून बुलढाणा जिल्ह्यात २, अमरावती व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १, हिंगोलीमध्ये १ आणि परभणीमध्ये एक एकून अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा, टरबूज, पपई, भाजीपाला, शेवगा, तूर, मका, ज्वारी, हळद व सूर्यफुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक ५२४२ हेक्टरमध्ये अकोला जिल्ह्यात, ११२० हेक्टर बुलढाणा, ५२३ हेक्टर अमरावती, २५५ हेक्टर यवतमाळ व १८.४८ हेक्टरमध्ये वाशिम जिल्ह्यात नुकसान झाले आहे.तर 11 एप्रिल पर्यंत पावसाचा जोर कायम राहील अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

घराचे पत्रे उडून रात्रभर कुटुंब रस्त्यावर

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कापूस आणि गहू पावसाने ओला झल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडल्याने वीज खंडित झाली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने उभे पिके भूईसपाट झाले आहेत.

रत्नागिरीमध्ये देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पहाटेच्या सुमारास जवळपास वीस मिनिटं अधिक अवकाळी पाऊस बरसला आहे. आंबा बागायतदरांमध्ये यामुळे धास्ती भरली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे दर गडगडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केसकरवाडी गावात नारळाच्या झाडावर वीज पडली

दोन दिवसांपासून पंढरपूर परिसरात वादळी वारे व अवकाळी पाऊस सुरू आहे. रात्री पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. तर ईश्वर वठार गावात ही वीज पडून एका शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT