Maharashtra Politics:  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शरद पवारांची बाजू भक्कमच', कोण कोणास म्हणालं?..! दिवसभरातल्या तिखट प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजच्या दिवसाचं राजकारण

Maharashtra Politics: दिवसभरातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून दिवसभरातील राजकारण समजून घेऊयात

Vishal Gangurde

Maharashtra Latest News:

राष्ट्रवादी कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत खुद्द शरद पवारांनी हजेरी लावली. अजित पवार गटानेही पक्षावर दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. तर शरद पवारांनी हजारो कागदपत्रे सादर केली आहेत. आयोगात हा वाद सुरू असताना जयंत पाटील यांनी या वादावर मोठं भाष्य केलंय. तसेच दिवसभरातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून दिवसभरातील राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कोणाची या वादावार भाष्य करताना म्हणाले की, 'शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे. त्यात शंका घेण्याचा कारण काय? दुसऱ्या बाजूचे लोक त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच. मात्र, पक्ष-पक्षाच्या ठिकाणी आहे'.

'आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलेला आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी शपथपत्रे दिले आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहे.

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार, यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केलेला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत जात आहेत, असं मी प्रसारमाध्यमांमधून ऐकलेलं आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

शरद पवारांवर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, 'राष्ट्रवादी पक्ष घडवण्यात आमचाही खारीचा वाटा आहे. शरद पवारांनी माझ्याच बंगल्यावर पक्षाचं नाव आणि चिन्हं ठरवलं होतं'.

'शरद पवार म्हणतात की, ते संस्थापक अध्यक्ष आहेत, त्याप्रमाणे मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? तुमचा वाटा मोठा आहे, पण आमचाही खारीचा वाटा आहे की नाही ? असा सवाल छगन भुजबळांनी केला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे यांनी नांदेड मृत्यू प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'उलटा चोर कोतवाल को डांटे'. बावनकुळे जी, देवाचे आभार माना की कोविड काळात उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, नाहीतर तुम्ही लिहायला आणि आम्ही वाचायला शिल्लक राहिलो नसतो, अशा शब्दात अंधारे यांनी प्रत्युत्त दिलंय.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे 'मी त्यांना कधीच उत्तर देत नाही, कारण ते त्या पात्रतेचे नाहीत. पात्रतेचे नाही म्हणजे ते काहीही बोलतात. ते काही बोलत असेल तर त्याला काय उत्तर देऊ', असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT