Maharashtra Political Reaction Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Reaction: आता सरकारला झोप येणार नाही; दिवसभरातील झणझणीत राजकीय प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजचं राजकारण

Maharashtra Political Reaction: मंत्री छगन भुजबळ यांनीही आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Vishal Gangurde

Maharashtra Political Reaction:

राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते जाहीर सभेत आक्रमक भाष्य करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. तर मंत्री छगन भुजबळ यांनीही आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

मनोज जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे यांनी आरक्षणावर भाष्य केल. 'आम्ही राजगादीचा आशीर्वाद घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढण्याचा विचार दिला आहे. मी पाया पडण्यासाठी आलो होतो. त्यामुळे आशीर्वाद घेणारच. राजेंची भेट घेतल्यानंतर सर्वांनाच उर्जा मिळते. दोन्ही राजेंचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एवढंच या पवित्र भूमीत बोलेल. पुढचं मात्र बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'दोन्ही राजांची साथ सर्वोच्च मानतो. नेत्यांचा विषय इथे नाही. मायेने पाठीवर हात फिरवणारं आमचं स्वर्गासारखं मंदिर आहे. राजगादीचं आशीर्वाद घेणं आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही घेतलं आहे. आम्ही सामान्य जनतेसाठी लढणार आहोत.आरक्षण मिळवणार आहोत, असेही जरांगे म्हणाले.

'काल कोल्हापूर आणि आज साताऱ्यात दोन्ही राजगादीचा आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे सरकारला झोपच येणार नाही,असा इशाराही जरांगे यांनी दिला.

मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्यानंतर मराठा समाजातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. 'आम्ही आमचं दुःख मांडलं, अन्याय मांडला. तो सुद्धा मांडायचा नाही का ? त्यांना वेगळं द्या, असं आम्ही म्हणतो. हे बोलणं सुद्धा वाईट आहे का ? आमदारांची घरे जाळली, पेट्रोल बॉम्ब टाकले, हे काय मी केलं का? असे प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.

मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीत दोन गट?

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. 'आम्ही भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नाही. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका अजित पवार गटाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मांडली आहे. तसंच हीच पक्षाची भूमिका असल्याचही पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे जाहीर करावी, अशी विनंती आम्ही अजित पवारांकडे करणार असल्याचंही आहेर म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT