महाराष्ट्र

ladki bahin yojana : १६००० लाडक्या बहिणींचे 'आधार' जुळेना; राज्यातील टॉप घडामोडी एका क्लिकवर, वाचा VIDEO

maharashtra Latest news : पुण्यातील १६००० लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेना झालं आहे. राज्यातील टॉप घडामोडी वाचा एका क्लिकवर.

Saam Tv

लाडकीचे आधार जुळेना

पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नाही आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी सुरू करण्यात आलीय..यातून ही माहिती समोर आलीय.

सोन्याचा दर घसरला

जळगावच्या बाजारात सोन्याचे दर एक हजार रुपयांनी घसरलेयत..डॉलरच्या तुलनेत रुपया त्याचबरोबर रशियाई युक्रेन मध्ये काही प्रमाणात निवळलेली युद्धजन्य परिस्थिती याचा परिणाम थेट जळगाव येथील सुवर्णनगरीवर झाला.

मंत्रालयात प्रवेशासाठी कठोर नियम

मंत्रालयात प्रवेशासाठी राज्य सरकारनं कठोर नियम केलेत. मंत्रालयात आता ऑनलाइन नोंदणी केल्यावरच प्रवेश मिळणारेय. DigiPravesh या अॅपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोडच्या आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय..

एलफिन्स्टन पूल पाडणार

मुंबईत 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. 10 एप्रिलपर्यंत वाहतूक विभागाची एनओसी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात पाडकामाला सुरूवात होईल. नवीन पूल बांधण्यासाठी किमान 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे.

पुण्यात 100 कॅमेऱ्यांनाच AI टेक्नॉलॉजी

पुण्यात महत्त्वाकांक्षी सुरक्षिततेसाठी 2 हजार 866 कॅमेऱ्यांपैकी 100 कॅमेऱ्यांनामध्येच AI तंत्रज्ञानाचे लायसन मिळालंय. तर या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 433 कोटींचा निधी मंजूर केलायं. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कमांडर सेंटर आणि कंट्रोल रूम उभारण्यात येणारेय.

बस चालवताना मोबाईल वापरल्यास होणार कारवाई

PMPLने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. बस चालवताना मोबाईल वापर आणि तंबाखू सेवन केल्यास निलंबन होणारंय. तसेच यासंदर्भात तक्रारींसाठी व्हॉट्सप क्रमांक जारी करण्यात आलाय.

हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन

नागपूर दंगलीच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात आले. विधानभवनच्या बाहेर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केले..यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान वार्तांकन करताना पोलीस आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

कुणाल कामरा वक्तव्यावर ठाम

कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. त्यानं एक्सवर पोस्ट करत माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच मी बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकीही नाही, असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय, असा दावाही केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT