Maharashtra Today Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात सूर्य आग ओकतोय, मुंबईसाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे; काय आहे हवामानाचा अंदाज?

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली असून कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह अनेक भागांत पुढील काही दिवस उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • अवकाळी पावसानंतर राज्यात तापमानात वाढ

  • कोकणात दमट हवामान; येलो अलर्ट जारी

  • मुंबईत पुढील ५ दिवस उकाड्याचा इशारा

  • अकोल्यात सर्वाधिक ३८.७°C तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने राज्यभरात चांगलातच धुमाकूळ घातला. मात्र आता तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात उन्हाचे चटके तापदायक ठरत आहेत. दिवसभर ऊन सावलीचा खेळ आणि संध्याकाळनंतर गारठा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईतही पुढील ५ दिवस तापमान वाढीचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे नीचांकी १५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

तसेच सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी राजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तर दुसरीकडे मे महिना सुरु होण्यापूर्वीच वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या कडाक्याच्या उन्हातून बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

SCROLL FOR NEXT