Maharashtra Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : राज्यावर अवकाळीच संकट! पुढील ४८ तास महत्त्वाचे, ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३०-३१ मार्चदरम्यान पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • कोकणात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

  • विदर्भात वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी

  • ३०-३१ मार्चला गारपीट आणि पावसाची शक्यता

  • राज्यात काही भागात उष्णतेचा चटका वाढणार

Maharashtra Today Weather News Update राज्यात काही भागात पुढील काही दिवस अंशतः आभाळी हवामान राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले. कोकणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

काल म्हणजेच गुरूवारी अकोल्यासह अमरावती, ब्रह्मपुरी, ‎वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎नागपूर, परभणी, सोलापूर, ‎चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी आढळराव पाटलांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

महाराष्ट्रावरील ढग गायब, पाऊस गेला कुणीकडे? पुढील २ दिवस कसं असेल हवामान?

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT