MAHARASHTRA DOCTOR RECRUITMENT: 1,440 DOCTORS TO BE APPOINTED SOON, SAYS PRAKASH ABITKAR 
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Health Department Recruitment: राज्यात १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात आली असून सुमारे २५० दंतचिकित्सकही आरोग्य सेवेत उपलब्ध होणार आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यात १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती होणार

  • आणखी ६०० डॉक्टरांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली

  • सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होणार

राज्यात येत्या काही दिवसांत १,४४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात आलीय.सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. यावेळी त्यांनी आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

या संवादात आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचं आबिटकर म्हणाले.

आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल. स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या गुणवत्तेचा सकस आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार, असेही त्यांनी सांगितले.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची सूचना केली. तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा, असेही त्यांनी सुचविले. या सूचनांना आरोग्यमंत्री श्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT