TET Exam 2024 saam tv
महाराष्ट्र

Maharashtra TET : टीईटी परीक्षेची तारीख जाहीर; राज्यातील एकूण १०२९ केंद्रांवर होणार परीक्षा

Maharashtra TET Exam Date: टीईटी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.

Ruchika Jadhav

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

MSCE मंडळातर्फे 2024 संपूर्ण राज्यात विविध शिक्षक पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी भरती मंडळाद्वारे आयोजित केली जाणार आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करणे

महाराष्ट्राच्या TET परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जवळ असणे महत्वाचे आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला mahatet.in TET या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र येथे मिळेल.

राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार आहे. यात ‘पेपर एक’ साठी एक लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर एकची परीक्षा ४३१ परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दोन लाख एक हजार ३४० उमेदवार ‘पेपर दोन’ची परीक्षा देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

Maharashtra News Live Update: जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

SCROLL FOR NEXT